Friday, August 9, 2019

चिवडा चुरमुर्‍याचा/ मुरमुरे

         
         

चुरमुरे (मुरमुरे) चिवडा 
Hello friends......
                 आजचा जो खाऊ आहे तो आवडत नाही...असा माणूस शोधून ही सापडणार नाही.....नातवा येवढाच तो आजोबांनाही आवडतो....आई बाबा ताई दादा....यांना ही तेवढाच प्रिय आहे.....मित्रांसोबतच्या पार्ट्यांची तर त्याच्या शिवाय कल्पनाच करू शकत नाही.....बाहेरगावी जाणाऱ्या बॅग मध्ये तर त्याची जागा राखीव असते....दिवाळीच्या फराळात पहिला मान त्याचाच....जरा जास्तच भाव खातोय ना....तर या भाव खाणार्‍या खाऊच नाव आहे चिवडा... तो खूप वेगवेगळी रूप घेवून आपल्या समोर येतो आणी प्रत्येक रूपात भाव खावून जातो ....चुरमुर्‍याच्या साथीने खुललेलं त्याच एक रूप आपण पाहणार आहोत....तर बघूया मग त्या साठी लागणार साहित्य आणी कृती 
   साहित्य: -..   400 ग्रॅम मुरमुरे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळव ,1 वाटी  मका पोहे ,1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 2 चमचे चिवडा मसाला, 1 चमचा पीठी साखर ,चवी नुसार मीठ....
         अर्धी जुडी बारीक कापलेला पालक 1 वाटी बारीक कापलेली कोथिंबीर 1 वाटी कडीपत्ता 6 मिरच्या बारीक तुकडे करून थोडा पुदिना कट करुन 10 लसूण पाकळ्या खिसून....आणी 250 ग्रॅम तेल 
              कृती :-....एका भांड्यात तेल गरम करून शेंगदाणे आणी मका पोहे तळूण बाजुला काढून घ्यावेत... त्यानंतर कडीपत्ता हिरवी मीरची पालक कोथिंबीर शेवटी लसूण...या क्रमाने फोडणी करून घ्यावी...फोडणीतल्या जिन्नस कुरकुरीत झाल्या पाहीजेत पण जळायला नकोत.....
              फोडणी तयार झाल्यावर हळद तिखट चिवडा मसाला घालून घ्यावा... नंतर.....मुरमुरे घालून हालवून घ्यावे व त्यावर मीठ साखर व चिवडा मसाला मका पोहे शेंगदाणे डाळव घालून व्यवस्थित हालवून एकजीव करावे..म्हणजे मीठ मसाला सगळीकडे व्यवस्थित लागेल....
आणी मस्त कुरकुरीत चविष्ट चिवडा तयार होईल...त्याच्यात कांदा टोमॅटो कैरी कोथिंबीर घालून भेळ करून खाल्ल्यावर तर अजूनच भारी.....
सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी छान खाऊ तयार... हा खाऊ तयार करायला

Sunday, July 28, 2019

तिखट पुरी



   Hello friends.......
                               आषाढ संपत आला..गोड पुर्‍यांचा नंबर होऊन गेला ....रेसिपी ही पाठवून झाली आणी....पुर्‍या ही संपल्या....पण तिखट पुर्‍या ची गाडी काही पुढे सरकत नव्हती....आज मनापासून मनावर घेतले...कारण तिखट पुर्‍या शिवाय... तळलेला आकाड पूर्ण होत नाही....आणी गोड पुर्‍या ला शोभाही येत नाही.....
                 आषाढ आणी पर्यायाने आकाड...मला दरवर्षीच माझ बोट धरून...माझ्या बालपणात घेवून जातो....जिथे आजी, आई, काकू, मावशी, आत्या, वहिनी ,ताई ...या सर्वांच्या हातच्या चवीची आठवण करून देतो....कारण तेव्हा...घरीच करायचं आणी एकट्यानेच खायचं अशी प्रथा पडलेली नव्हती.... "अंग राणी....माझ्या तिखट पुर्‍यांना तिखट मीठ बरोबर आहे का बघ बरं जरा "....किंवा "काकू घार्‍या गोड झाल्यात का ते बघता का जरा....गूळ थोडा कमीच होता....". आज तिखट पुर्‍यांसाठी कोथिंबीर ही पुरती नव्हती.... तुम्ही खावून पाहिलं म्हणजे....बाकीच्यांकडे डबे पाठवायला मोकळी "...😁 .... असे आपुलकीचे संवाद कानावर पडायचे....
               आता समाजव्यवस्था बदलली....तसी ती आपुलकी संपली आणी तो जिव्हाळा ही संपला....उरल्या त्या फक्त आठवणी... एक अमूल्य खजिना....😍
                   
चला भूतकाळातून....वर्तमानानात येवूया आणी पाहूया तिखट पुर्‍यांच्या रेसिपी साठी लागणार साहित्य आणी कृती....👏
साहित्य....:- 2 वाट्या गव्हाचे पीठ 1 वाटी ज्वारीचे पीठ 1 वाटी बेसन पीठ(भाजणी असेल तर ती ही घेऊ शकता)  1 च.  धने पूड 1 च. जिरे पूड 1 च. लाल तिखट 1/2 चं हळद 1 च.ओवा 4 च . पांढरे तिळ... आणी वाटलेले वाटण  ( हिरवी मिरची +लसूण +अदरक +पुदिना +कोथिंबीर +जिरे = हिरवी चटणी किंवा वाटण  ) चवीनुसार मीठ आणी तळण्यासाठी तेल....
             
हे झाले तिखट पुर्‍याचे साहित्य....पण यामध्ये अर्धी जुडी  (गड्डी) पालक बारीक चिरून घातला तर पुर्‍या अधिक टेस्टी आणी पौष्टिक होतील....म्हणून आपण पालकही घालूया...
1...आणी घट्ट असे पुर्‍याचे पीठ मळून घेवूया
2...त्यानंतर त्याच्या तेल लावून एकसारख्या गोळ्या ( लाट्या )करून  घेवूया ..
3....पुढची स्टेप म्हणजे वरचेवर पुर्‍या लाटून घ्यायच्या... एकदम लाटून ठेवल्या तर एकमेकांना चिकटतील...
4.... नंतर...मस्त अशा तळून घ्यायच्या....झाल्या तिखट पुर्‍या तयार
5.... पुर्‍या तशाही छान लागतात...पण थंड थंड दह्या
सोबत...अप्रतिम लागतात...
6...... हवं असल्यास...लोणचं आणी शेंगा चटणीलाही सोबत घेऊ शकता....लज्जत अजूनच वाढेल....
7.....पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे....ज्यांना तळलेल किवा तेलकट खायचं नाही....त्यांनी या पीठाचा पराठा लाटावा आणी  तव्यावर कमी तेल ,तूप,लोणी ..काहीही घालून..छान खरपूस भाजून घ्यावा ...आणी थंड दह्या सोबत गरम गरम पराठा....मस्त  निवांत बसून...फस्त करावा ...😅👏
 
काय मग करणार ना "गोड पुरीला बहिण आणण्याची तयारी.... नाव तीच तिखट पुरी.....😅😅👏
         
   Bhagyashri Tapkir Nimbalkar..pune..👏🙏

Thursday, July 25, 2019

कांदा भजी / गोल भजी

   
             

Hello frainds....
                   आजचा विषय आहे भजी.....रेसिपी न म्हणता विषय म्हणाले....कारण भजी हा खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय....कोणताही सण वार आणी पाहुणचार भजी शिवाय पार पडत नाही...घरोघरी बनतात ....तरीही ओढ काही कमी होत नाही.....म्हणून आज.. गोल भजी किंवा कांदा भजीची रेसिपी...  रेसिपी म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या टिप्स...
साहित्य.....:- 2 कांदे कट करुन, 4 मिरच्या बारीक तुकडे, करून 1 वाटी बारीक चिरलेला पालक, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर हिंग ,दोन चिमूट सोडा, चवीनुसार मीठ ,आणी 1 वाटी बेसन पीठ.... आणी तळण्यासाठी तेल....
कृती.....:- सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करून छान मिक्स करून घ्यावे....थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे...पीठ जास्त पातळ न होऊ देता लगेच भजी तळून घ्यावी....पीठ जास्त वेळ ठेवले तर पातळ होते आणी मग भजी कुरकुरीत होत नाहीत... लूज पडतात...म्हणून लगेच
भजी तळूण घ्यावीत.... तळताना सुरूला तेल खूप गरम नको...कमी तावात भजी सोडावी ती छान फुलली की मग गॅस मोठा करावा म्हणजे...आतून कच्ची किंवा पिठाळ रहाणार नाहीत.....भजी बनवताना..साहित्या एवढेच महत्त्व तेलाचा ताव..म्हणजेच तेल कीती गरम आहे यालाही तितकेच महत्त्व आहे......
थोडी काळजी घेतली की छान कुरकुरीत भजी तयार......( व्यवसायामुळे खूप सारी भजी बनवण्याचा अनुभव ).... 🙏🙏

Wednesday, July 24, 2019

लाल भोपळ्याची खीर

Hello frainds....
                   आजची रेसिपी आहे.....लाल भोपळ्याची खिर...( काशी भोपळा, देवडांगर अशी बरीच नावे आहेत)
 
साहित्य  :- लाल भोपळा ,नारळ ,दूध ,साखर, तूप ,खसखस, लवंग ,विलायची ,मनुका ,काजू ,बदाम ..
कृती  :- भोपळा साल काढून स्वच्छ करून घ्यावा...त्याचे छोटे छोटे तुकडे करून कुकरला लावून मऊ शिजवून घ्यावे....थंड झाल्यावर मिक्सरवर त्याची मऊ पेस्ट बनवून घ्यावी....
नंतर एका पातेल्यात दोन चमचे तूप गरम करावे त्यात विलायची लवंग तुकडे केलेले ड्रायफ्रुट आणी खसखस घालावी...फोडणी जळू न देता..लगेच दूध घालावे दूध गरम झाल्यावर खिसलेला ओला नारळ आणी साखर घालून उकळी आली की....
भोपळ्याची पेस्ट घालावी...वरून मनुका चारोळी जायफळ विलायची पावडर घालावी..दहा मिनिट खिर छान शिजवून एकजीव होऊ द्यावी....नंतर गॅस बंद केल्यावर...दोन चमचे साजूक तूप घालावे.....
ही खीर तुम्ही गरम गरम ही खाऊ शकता किंवा थंड करून ही खाऊ शकता ...  खिर उपवासालाही चालते.....आणी पौष्टिक ही असते.... लाल भोपळ्याचा फारसा वापर आपल्या आहारात होत नाही म्हणून हा....छानसा पर्याय..... 🙏☺

Tuesday, July 23, 2019

पुरी भाजी

 
 

Hello frainds...
                आजचा मेनू आहे पुरी भाजी......
तसे आपण पुरी भाजी नेहेमीच बनवतो.....पण ज्यांनी हॉटेलची पुरी आणी रस्सा भाजी खाल्ली आहे...त्यांची तक्रार असते...आपली भाजी हाॅटेल सारखी नाही होत ...मला हाॅटेल ची भाजी बनवण्याचा अनुभव आहे म्हणून आज पुरी भाजीची रेसिपी शेअर करते आहे....
पुरी साठी कणीक मीठ घालून घट्ट मळून घ्यायची..फ्रिज मध्ये नाही ठेवायची...नाहीतर पुर्‍या तेलकट होतात..पीठाचा रोल बनवायचा कट करायचा..... तेलाचा ताव मिडीयम असा
यला हवा...आणी पुर्‍या तळून घ्यायच्या...
रस्सा भाजी साहित्य :- दोन कांदे बारीक कट करुन ,छोटा तुकडा आलं खिसून, 6 पाकळ्या लसूण खिसून, कडीपत्ता, कोथिंबीर, 1 उकडलेला बटाटा कुस्करून ,2 चमचे मोडाची मटकी, 1/4 चमचा हळद ,1 चमचा लाल तिखट ,1/2 काळा मसाला, जिरे, मोहरी, 1/2 चमचा गरम मसाला ,चवीनुसार मीठ ,आणी फोडणी साठी तेल..
कृती  :- कढईत तेल टाका, नंतर जिरे ,मोहरी ,कडीपत्ता, कांदा घालूण गुलाबी रंगावर भाजून घ्यावा, त्यानंतर  लसूण ,आलं, तिखट ,काळा मसाला, मटकी ,आणी मीट ,घालून चांगले परतून घ्यावे...मग एक तांब्या पाणी घालून उकळी आल्यावर बटाटा, हळद, आणी गरम मसाला ,घालून मंद आचेवर  15मि राहू द्यावी...म्हणजे छान चव उतरते.... .तिखट झणझणीत तरी हा या भाजीचा आत्मा असतो....म्हणून आपल्याला झेपेल या हिशोबात तिखट कमी जास्त करू शकता... या भाजीला वाटलेले वाटण नसते....झाली भाजी तयार... पापड, कोशिंबीर, निंबू ,आणी पुरी भाजी.....पोट भरते पण मन भरत नाही....(.दोन व्यक्तींसाठी) 
              Bhagyashri Tapkir Nimbalkar pune

Saturday, July 20, 2019

घारगे ... भोपळ घार्‍या


Hello friends.......
                                "आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्र्लिष्ट सानुम् वप्रक्रिडापरिणतगज प्रेक्षणियं ददर्श...."
                   कवी कालीदास...यांना जसा आषाढ प्रिय....तसाच तो हळव्या मनाच्या प्रत्येक... व्यक्तीला भावतो..आकाशातून बरसणार्‍या अवखळ सरी....त्यातून बहरलेल धरणीच सुंदर हिरवीगार रूप...हेच तर आहे आषाढाच वैभव...
            आषाढी एकादशी....आणी डोळ्याचे पारणे फेडणारा भक्तीचा अलौकिक सोहळा याचं महिन्याची देन..
  खाद्य प्रेमींनसाठी तर आषाढ म्हणजे एक पर्वणीच...पुढचा महिना....श्रावण...म्हणून ...श्रावण पाळणारे...आषाढात मनसोक्त मांसाहार करून घेतात...
            तसेच...आषाढ साजरा करण्याची आणखी एक पद्धत...म्हणजे "आकाड तळणे " ... गोड आणी तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुर्‍या ,कापण्या आणी कडबोळी...बनवने म्हणजेच "आकाड तळणे..." पूर्वीच्याकाळी....सणासुदीलाच गोडा धोडाच खायला मिळायचं त्यामुळे त्याची किंमत वाटायची...आता..."राजाला दिवाळी माहीतच नाही "असा प्रकार झाला आहे....त्यामुळे अप्रूप कमी झालं आहे...
           पूर्वी घराघरातून येणारा खमंग वास आकाड तळल्याची साक्ष द्यायचा...... ही पंरपरा आजही कायम आहे..पण आता प्रमाण कमी होतं चालले आहे.... आज आपल्याकडे वेळ नाही....पण आपली खाद्य संस्कृती जपण्यासाठी....थोडासा वेळ तर काढायलाच हवा.... नाही तर आपल्या पुढच्या पिढी पर्यंत हे पदार्थ पोहचणार कसे... म्हणून मी आज थोडासा वेळ काढून "भोपळ घार्‍या " (म्हणजेच लाल भोपळ्याचे गुळ घालून केलेले घारगे किंवा गोड पुर्‍या..)केल्या आहेत...
साहित्य......:- लाल भोपळा 500 ग्रॅम ,गुळ 400 ग्रॅम  500 ग्रॅम गव्हाचे, पीठ 2 चमचे  तूप ,विलायची पावडर, आणी तळणायासाठी तेल...
कृती...:-1/.. सर्व प्रथम भोपळा साल काढून बारीक खिसणीवर खिसून घ्यावा...
2/..कढईत दोन चमचे तूप घालून नंतर किसलेला भोपळा घालून परतून घ्यावा
3/... त्यानंतर बारीक चिरून घेतलेला गुळ त्यात घालावा
4/....हे मिश्रण दहा मिनिट कमी आचेवर शिजवून घ्यावे..गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्यावे...
5/...थंड झाल्येल्या मिश्रणात मावेल एवढे गव्हाचे पीठ आणी विलायची पावडर घालून पीठ मळून घ्यावे....
6/ जास्तीचे पाणी न घालता..तेलाच्या हाताने मऊ असा गोळा तयार करून घ्यावा...
7/.... त्या गोळ्याच्या.. पेढ्या सारख्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्याव्या...
8/... लगेच पुर्‍या लाटून....मस्त गरम तेलात तळून घ्याव्या ..
9/... ज्यांना जास्त तेलकट खायचे नसेल....ते या पिठाचा पराठा लाटून...तव्यावर कमी तेलात भाजून ही खाऊ शकता
   10/...या पुर्‍या अशाच छान लागतात.. हवे असल्यास शेंगदाण्याची चटणी लोणच किंवा तळलेली मिर्ची....घेवू शकता... पुर्‍या लवकर खराब होत नाहीत...प्रवासातही घेवून जाऊ शकता....मुलांच्या टिफिन साठी पौष्टिक असा एक उत्तम पर्याय आहे....
  चला तर मग "भोपळ घार्‍या" करूनआषाढ साजरा करूया आणी सोबतचं आपली खाद्य संस्कृती ही जपूया...👏😃
    मी तुमची सखी....
      Bhagyashri Tapkir Nimbalkar..Pune 👏









Khawa modak- mawa modak in marathi

 Bhagyashri Tapkir Nimbalkar

#Hello frainds....
                             आज चतुर्थी....उपवास, पूजा आणी नैवेद्य....
            गणपतीला प्रिय असलेली दुर्वा, लाल फूल आणी मोदक लाडू...गुळ खोबर्‍याचे सारण असलेले....कधी उकडीचे तर कधी तळलेले, कधी खव्याचे ,तर कधी तिळाचे असे नानाविध प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात...पण बर्‍याच वेळा मिठाईच्या दुकानातून मोदकाच्या आकाराचे पेढे आणले जातात.... ते कधी तयार केलेले असतात..आणी त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे आपण सर्व जाणताच....म्हणून.. आज आपण घरीच बनवूया....खव्याचे छानसे मोदक.... आपल्या लाडक्या गणेशजी साठी....
  साहित्य  :-..... 500 ग्रॅम खवा  ( मावा), 400 ग्रॅम साखर, विलायची, जायफळ आणी असेल तर केशर( नसेल तर खायचा केशरी रंग ) कलर नको असेल तर तसेही छान दिसतात....
कृती.....:- खवा आणी साखर मिक्स करून मंद आचेवर गॅसवर ठेवून सतत चमच्याने(उलतण्याने)  ढवळत रहावे...साधारण दहा ते बारा मिनिटांनी गॅस बंद करावा...नंतर विलायची पावडर जायफळ आणी केशर घालून मिक्स करून घ्यावे...थंड झाल्यावर छान एकजीव करून त्याचे साच्याच्या साह्याने मोदक तयार करून घ्यावेत.....खूप सोपी रेसिपी आहे...पण तरीही....बिघडण्याची शक्यता जास्त आहे ...म्हणून थोडी जास्त काळजी घेण्याची गरज असते....
1..गॅस खूप बारीक म्हणजेच मंद असायला हवा
2... चमच्याने सतत ढवळत रहावे...म्हणजे भांड्याच्या तळाला लागणार नाही...
3 ... मिश्रण पातळ दिसत असले तरी ते नंतर घट्ट होतो..सेट होते....म्हणून...दहा मिनिटात गॅस नक्की बंद करावा आणी तरीही....जास्त कडक किंवा घट्ट झाले तर मिक्सरला फिरवून मोदक तयार करावेत....
     तयार पेढा तसाही खाऊ शकतो...किवा पुरण पोळी सारख्या...मस्त खव्याच्या पोळ्याही करू शकतो...बाहेरच्या पेढ्या पेक्षा या पेढ्याची चव उत्तम असते...शिवाय आरोग्याला हितकारक.....करणार ना मग....ताजे ताजे खव्याचे मोदक...गणपती बाप्पा साठी...👏

Bhagyashri Tapkir

(250 ग्रॅम खवा आणी 200 ग्रॅम साखर घेवून बनवले तरी 25 मोदक आरामात होतात...) 🙏

चिवडा चुरमुर्‍याचा/ मुरमुरे

                    चुरमुरे (मुरमुरे) चिवडा  Hello friends......                  आजचा जो खाऊ आहे तो आवडत नाही...असा माणूस शोधून...