Sunday, July 28, 2019

तिखट पुरी



   Hello friends.......
                               आषाढ संपत आला..गोड पुर्‍यांचा नंबर होऊन गेला ....रेसिपी ही पाठवून झाली आणी....पुर्‍या ही संपल्या....पण तिखट पुर्‍या ची गाडी काही पुढे सरकत नव्हती....आज मनापासून मनावर घेतले...कारण तिखट पुर्‍या शिवाय... तळलेला आकाड पूर्ण होत नाही....आणी गोड पुर्‍या ला शोभाही येत नाही.....
                 आषाढ आणी पर्यायाने आकाड...मला दरवर्षीच माझ बोट धरून...माझ्या बालपणात घेवून जातो....जिथे आजी, आई, काकू, मावशी, आत्या, वहिनी ,ताई ...या सर्वांच्या हातच्या चवीची आठवण करून देतो....कारण तेव्हा...घरीच करायचं आणी एकट्यानेच खायचं अशी प्रथा पडलेली नव्हती.... "अंग राणी....माझ्या तिखट पुर्‍यांना तिखट मीठ बरोबर आहे का बघ बरं जरा "....किंवा "काकू घार्‍या गोड झाल्यात का ते बघता का जरा....गूळ थोडा कमीच होता....". आज तिखट पुर्‍यांसाठी कोथिंबीर ही पुरती नव्हती.... तुम्ही खावून पाहिलं म्हणजे....बाकीच्यांकडे डबे पाठवायला मोकळी "...😁 .... असे आपुलकीचे संवाद कानावर पडायचे....
               आता समाजव्यवस्था बदलली....तसी ती आपुलकी संपली आणी तो जिव्हाळा ही संपला....उरल्या त्या फक्त आठवणी... एक अमूल्य खजिना....😍
                   
चला भूतकाळातून....वर्तमानानात येवूया आणी पाहूया तिखट पुर्‍यांच्या रेसिपी साठी लागणार साहित्य आणी कृती....👏
साहित्य....:- 2 वाट्या गव्हाचे पीठ 1 वाटी ज्वारीचे पीठ 1 वाटी बेसन पीठ(भाजणी असेल तर ती ही घेऊ शकता)  1 च.  धने पूड 1 च. जिरे पूड 1 च. लाल तिखट 1/2 चं हळद 1 च.ओवा 4 च . पांढरे तिळ... आणी वाटलेले वाटण  ( हिरवी मिरची +लसूण +अदरक +पुदिना +कोथिंबीर +जिरे = हिरवी चटणी किंवा वाटण  ) चवीनुसार मीठ आणी तळण्यासाठी तेल....
             
हे झाले तिखट पुर्‍याचे साहित्य....पण यामध्ये अर्धी जुडी  (गड्डी) पालक बारीक चिरून घातला तर पुर्‍या अधिक टेस्टी आणी पौष्टिक होतील....म्हणून आपण पालकही घालूया...
1...आणी घट्ट असे पुर्‍याचे पीठ मळून घेवूया
2...त्यानंतर त्याच्या तेल लावून एकसारख्या गोळ्या ( लाट्या )करून  घेवूया ..
3....पुढची स्टेप म्हणजे वरचेवर पुर्‍या लाटून घ्यायच्या... एकदम लाटून ठेवल्या तर एकमेकांना चिकटतील...
4.... नंतर...मस्त अशा तळून घ्यायच्या....झाल्या तिखट पुर्‍या तयार
5.... पुर्‍या तशाही छान लागतात...पण थंड थंड दह्या
सोबत...अप्रतिम लागतात...
6...... हवं असल्यास...लोणचं आणी शेंगा चटणीलाही सोबत घेऊ शकता....लज्जत अजूनच वाढेल....
7.....पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे....ज्यांना तळलेल किवा तेलकट खायचं नाही....त्यांनी या पीठाचा पराठा लाटावा आणी  तव्यावर कमी तेल ,तूप,लोणी ..काहीही घालून..छान खरपूस भाजून घ्यावा ...आणी थंड दह्या सोबत गरम गरम पराठा....मस्त  निवांत बसून...फस्त करावा ...😅👏
 
काय मग करणार ना "गोड पुरीला बहिण आणण्याची तयारी.... नाव तीच तिखट पुरी.....😅😅👏
         
   Bhagyashri Tapkir Nimbalkar..pune..👏🙏

No comments:

Post a Comment

चिवडा चुरमुर्‍याचा/ मुरमुरे

                    चुरमुरे (मुरमुरे) चिवडा  Hello friends......                  आजचा जो खाऊ आहे तो आवडत नाही...असा माणूस शोधून...