Hello frainds...
आजचा मेनू आहे पुरी भाजी......
तसे आपण पुरी भाजी नेहेमीच बनवतो.....पण ज्यांनी हॉटेलची पुरी आणी रस्सा भाजी खाल्ली आहे...त्यांची तक्रार असते...आपली भाजी हाॅटेल सारखी नाही होत ...मला हाॅटेल ची भाजी बनवण्याचा अनुभव आहे म्हणून आज पुरी भाजीची रेसिपी शेअर करते आहे....
पुरी साठी कणीक मीठ घालून घट्ट मळून घ्यायची..फ्रिज मध्ये नाही ठेवायची...नाहीतर पुर्या तेलकट होतात..पीठाचा रोल बनवायचा कट करायचा..... तेलाचा ताव मिडीयम असा
यला हवा...आणी पुर्या तळून घ्यायच्या...
रस्सा भाजी साहित्य :- दोन कांदे बारीक कट करुन ,छोटा तुकडा आलं खिसून, 6 पाकळ्या लसूण खिसून, कडीपत्ता, कोथिंबीर, 1 उकडलेला बटाटा कुस्करून ,2 चमचे मोडाची मटकी, 1/4 चमचा हळद ,1 चमचा लाल तिखट ,1/2 काळा मसाला, जिरे, मोहरी, 1/2 चमचा गरम मसाला ,चवीनुसार मीठ ,आणी फोडणी साठी तेल..
कृती :- कढईत तेल टाका, नंतर जिरे ,मोहरी ,कडीपत्ता, कांदा घालूण गुलाबी रंगावर भाजून घ्यावा, त्यानंतर लसूण ,आलं, तिखट ,काळा मसाला, मटकी ,आणी मीट ,घालून चांगले परतून घ्यावे...मग एक तांब्या पाणी घालून उकळी आल्यावर बटाटा, हळद, आणी गरम मसाला ,घालून मंद आचेवर 15मि राहू द्यावी...म्हणजे छान चव उतरते.... .तिखट झणझणीत तरी हा या भाजीचा आत्मा असतो....म्हणून आपल्याला झेपेल या हिशोबात तिखट कमी जास्त करू शकता... या भाजीला वाटलेले वाटण नसते....झाली भाजी तयार... पापड, कोशिंबीर, निंबू ,आणी पुरी भाजी.....पोट भरते पण मन भरत नाही....(.दोन व्यक्तींसाठी)
Bhagyashri Tapkir Nimbalkar pune




Zakkas recipe. Presentation is tooo yummy...
ReplyDeleteToo good
ReplyDeleteखुप छान चटकदार तोंडाला पाणी सुटलं..
ReplyDeleteThanks 👏😊
Delete